किरण पी गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात, अटकेच्या कारवाईची शक्यता

 

पुणे | ड्रग्ज पार्टीत आर्यन खान अटक प्रकरणातील एनसीबीचा पंच असलेला फरार आरोपी के पी गोसावीला आज सकाळी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बुधवारी संध्याकाळी के पी गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. कालपर्यंत तो शरण आला नाही. अखेर पुणे पोलिसांनी आज त्याला ताब्यात घेतलं आहे. तसेच आजच त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

मागच्या अनेक दिवसांपासून पुणे पोलिसांच्या टीम के पी गोसावीला शोधत होती. तसेच तो विदेशात पळून जाऊ नये म्हणून त्याच्या विरोधातलूक आऊट नोटिस देखील जारी करण्यात आलेली होती. त्यानुसार पुणे पोलिसांचं पथक त्याचा शोध घेत होतं. अखेर आज सकाळी पुणे पोलिसांनी गोसावीला ताब्यात घेतलं असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी होय किरण गोसावीला आम्ही ताब्यात घेतल्याची अधिकृत माहिती त्यांनी दिलेली आहे. पुण्यातील फरासखाना पोलिस स्टेशनकडून त्याच्या अटकेची कारवाई होऊ शकते, असा अंदाज आहे. किरण गोसावी हा परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्स रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. के. पी. जी. ड्रीम्स कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे.

Team Global News Marathi: