किरण माने हे उत्तम वक्ता, त्यांनी राजकारणात प्रवेश करावा

 

मुलगी झाली हो या कार्यक्रमातून न सांगता अभिनेता किरण माने यांना काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जनतेने तसेच सरकार मधील अनेक मंत्र्यांनी पाठिंबा दिला होता. तर दुसरीकडे विरोधकांनी याच मुद्दयावरून माने यांना टार्गेट केले होते मात्र दुसरीकडे माने यांनी विरोधकांच्या टीकेला सुद्धा सडेतोड प्रतिउत्तर दिले होते.

मागच्या काही महिन्यापासून किरण माने हे सोशल मीडियावर स्वतंत्र मत मांडत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून मी माझे मत मांडत असल्याचे प्रतिउत्तर माने यांनी विरोधकांना दिले होते. आता या बरोबर मराठी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद याना विचारले असता त्यांनी किरण माने यांना राजकारण प्रवेश करण्याचा सल्ला दिला आहे.

एखाद्या व्यक्ती ने कोणती भूमिका घेतली म्हणून त्यांना मालिकेतून काढून टाकने आणि चुकीच्या बातम्या बाहेर पसरवणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. मुळात किरण माने हे उत्तम वक्ता आहेत. आपले मुद्दे मांडण्याची कला त्यांना अवगत आहे, त्यामुळे त्यांनी राजकारणात यावे असे दिपाली सय्यद यांनी म्हंटल.

Team Global News Marathi: