किंग खान शाहरुख’ने आर्थर रोड कारागृहाच्या बाहेर जमलेल्या चाहत्यांना हात जोडून केला नमस्कार

 

मुंबई | ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानाला द्यात कोराकडून कोणाही दिलासा माळेला नसून त्यांची आर्थर रोड कारागृहत रवानगी करण्यात आलेली आहे. त्यातच त्यांचे पिता आणि किंग खान शाहरुख खान’ने आर्थर रोड कारागृहात जाऊन आर्यन खानची भेट घेतली.

यावेळचे अनेक व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच बरोबर, शाहरुख खानचा आणखी एक व्हिडीओही व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये शाहरुख आर्यनला भेटून कारागृहाबाहेर येत आहे, यावेळी एक चाहता त्याला हात जोडून नमस्कार करतो, यानंतर शाहरुखही त्याला हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे.

शाहरुखचा हा स्वभाव पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत. चाहते म्हणत आहेत, एवढ्या कठीण परिस्थितीतही शाहरुख किती आरामात चाहत्यांना अभिवादन करत आहे. एका चाहत्याने म्हटले आहे, “शाहरुख खान कोण आहे? हे तुम्हा सर्वांना सांगण्यासाठी केवळ काही सेकंदच पुरेसे आहेत. अशा कठीण काळातही तो आपल्या चाहत्यांना किती आदर देत आहे, वाह.” असे म्हणत चाहत्यांनी त्याच कौतुक केलं आहे.

Team Global News Marathi: