मंत्रिमंडळ विस्तारानंतर संभाव्य खातेवाटपाची यादी पहा

 

मुंबई | राज्यात गेल्या ४० दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज सकाळी 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला. एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कुणाला कोणतं खातं मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

कुणाला कोणते मंत्रिपद मिळणार? याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण सुत्रांच्या माहितीनुसार मंत्रिपदाची यादी फायनल झाली आहे. सर्वात महत्वाची दोन खाती गृह आणि अर्थ खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे तर नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. ही असतील संभाव्य खाती…

1) एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री (नगरविकास)
2) देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) गृह आणि अर्थ
3) राधाकृष्ण विखे पाटील – महसुल, सहकार
4) सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वन
5) चंद्रकांतदादा पाटील – सार्वजनिक बांधकाम
6) विजय कुमार गावित- आदिवासी विकास
7) गिरीश महाजन – जलसंपदा
8) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा
9) दादा भुसे – कृषी
10) संजय राठोड- ग्राम विकास
11) सुरेश खाडे – सामाजिक न्याय
12) संदीपान भुंभरे- रोजगार हमी
13) उदय सामंत – उद्योग
14) तानाजी सावंत- उच्च तंत्र शिक्षण मंत्री
15) रवींद्र चव्हाण- गृह निर्माण
16) अब्दुल सत्तार- अल्पसंख्यांक विकास
17) दीपक केसरकर- पर्यटन आणि पर्यावरण
18) अतुल सावे – आरोग्य
19) शंभूराज देसाई – उत्पादन शुल्क
20) मंगलप्रभात लोढा – विधी न्याय

Team Global News Marathi: