किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा

 

रायगड | छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यभरातून शिवप्रेमी या गडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने महाराष्ट्र पोलिसांकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सुचनांच्या जनजागृतीसाठी पोलिसांनी एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडीओमध्ये वाहतूक व्यवस्था आणि किल्ले रायगडाकडे येणाऱ्या शिवप्रेमींच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था कुठे करण्यात आली आहे आणि इतर सुविधांबाबत माहिती देण्यात आली आहे.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने युवराज संभाजीराजे व शहाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडणार आहे. तसेच, सोमवार ६ जून रोजी रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला येणाऱ्या शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आजच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती QR कोडच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

यामध्ये कार्यक्रमाची रुपरेषा, गडावर जाण्याचे व उतरण्याचे प्रमुख मार्ग, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा, अन्नछत्र, स्वच्छतागृहे, महिलांसाठी करण्यात आलेली स्वतंत्र व्यवस्था, गडाच्या पायथ्याला असलेली वाहनतळे, पायथ्याचे अन्नछत्र याची सर्व माहिती व नकाशे QR कोडच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच शिवप्रेमींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे.

Team Global News Marathi: