राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना बलात्काराच्या आरोपाची तक्रार मागे घेताच त्यांच्यावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने अर्थात करुणा यांनी आपल्या दोन्ही मुलांना बंगल्यावर डांबून ठेवल्याचा आरोप लगावला होता. या आरोपामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली होती. आता यावर खुद्द मानती धनंजय मुंडे यांनी खुलासा केला आहे.
आज पुन्हा काही माध्यमात माझ्याविरुद्ध श्रीमती करुणा शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या बातम्या प्रसिद्धीस येत आहेत. याबाबत मी खुलासा करू इच्छितो की, श्रीमती करुणा शर्मा यांच्या बाबतीत मी पूर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या वादात मी स्वतःहून उच्य न्यायालयात याचिका दाखल केली आहे,” अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
“सदर याचिकेत उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांना मना आदेशही दिला आहे. (इंजंक्शन) त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून उच्च न्यायालयाने मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश श्रीमती ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केली आहे. सदर मेडिएशनच्या दोन बैठका झालेल्या असून १३ फेब्रुवारी २०२१ रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व मुद्दे चर्चेत व निर्णयार्थ आहेत,” असंही त्यांनी सांगितले आहे.