खासदार सुधीर सावंत यांनी शिंदे गटात केला प्रवेश

 

मुंबई | माजी खासदार सुधीर सावंत यांनी बुधवारी शिंदे गटाला समर्थन दिले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री दीपक केसरकर व उदय सामंत यांच्या सोबत पक्ष वाढवणार असल्याचेही स्पष्ट केले. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सावंत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून देत माजी सैनिकाबाबत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन घेतले. त्यानंतर केसरकरांनी सावंत यांचे स्वागत केले.

माजी खासदार सुधीर सावंत हे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. पण त्यांनी बारा वर्षापूर्वी काँग्रेसचा राजीनामा देत बसपामध्ये प्रवेश केला होता. मात्र तेथे त्यांचे विचार न पटल्याने अखेर आप मध्ये प्रवेश केला. तेथून ही ते बाहेर पडले. त्यानंतर महाराष्ट्रात माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यात सक्रिय झाले होते. त्यांनी काँग्रेसमध्ये असताना अनेक प्रश्न मार्गी लावत सैनिकांचे संघटन ही केले होते.

हेच प्रश्न घेऊन शासन दरबारी अनेक प्रश्न मांडले पण त्याला न्याय मिळत नव्हता. अखेर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आठवड्यापूर्वी भेट घेतली या भेटीत मुख्यमंत्री शिंदे यांनी सैनिक प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेत त्यातून मार्ग काढला. तसेच सैनिक निधी वितरित करत अन् प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

Team Global News Marathi: