खासदार संजय राऊत घेणार सत्यपाल मलिकांची भेट; म्हणाले,

 

मुंबई | पुलवामा हल्ल्याबाबत जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अलीकडेच एक मोठा गौप्यस्फोट करून देशाच्या राजकारणात उडवून दिली होती. यावरून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या आरोपानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सत्यपाल मलिक यांची भेट घेणार आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, दिल्लीमध्ये अनेक भेटीगाठी घेणार आहे. त्यात जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनाही भेटणार आहे. पुलवामाबाबत त्यांनी जे काही खुलासे केले आहेत, ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. तो संपूर्ण विषय देशात पोहचू नये, यासाठी माध्यमांवर दबाव आणण्यात आला. पुलवामा हत्याकांडात काही गरबड असेल तर तो विषय वेगळ्या पद्धतीने जास्तीत जास्त देशात जायला हवा. सत्यपाल मलिक हे महत्त्वाचे नेते आहेत. ते सध्या सक्रिय आहेत. देशाच्या पुढील राजकारणात त्यांची काय मदत होऊ शकते, हे समजून घेणे आवश्यक आहे. आमचा आणि त्यांचा संवाद अनेक दिवसांपासन सुरू आहे. त्यामुळे दिल्लीत त्यांना भेटणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

तसेच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नावरही उत्तरे दिली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सल्ल्याची गरज नाही ते स्वयंभू नेते आहेत, असा टोला राज यांनी लगावला होता. या टीकेला आज खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही स्वयंभूच आहोत. जे स्वयंभू देव असतात त्यांच्या मागेच जनता जाते. जे शिंदुर फासतात त्यांच्यामागे जनता जात नाही. याच्यामुळे जर कोणाची पोटदुखी होत असेल तर सांगा आमच्यातकडे औषध आहे, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला.

Team Global News Marathi: