काँग्रेसचा बडा नेता महाबळेश्वरमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटला? उदय सामनात यांचा खळबळजनक खुलासा

 

सध्या राज्यात मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे यांना हटवलं जाणार का? याबाबत शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहेअशा अनेक चर्चा आहेत, मात्र ठाकरे गटाचे उरलेले तेरा आमदारही आमच्या संपर्कात असून, काँग्रेसच्या बड्या नेत्याने महाबळेश्वरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. उदय सामंत यांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे

महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलला जाणार का? शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा अनेक चर्चा आहेत, ठाकरे गटाकडे उरलेले तेरा आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत, राष्ट्रवादीचे वीस आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत, तर काँग्रेसच्या बड्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वर येथे भेट घेतल्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे. मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत विखे पाटलांचं नाव आघाडीवर दरम्यान राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलाबाबतच्या चर्चेला उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री बदलल्यास नवा मुख्यमंत्री कोण असणार या चर्चेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील याचं नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांनाही मुख्यमंत्रीपद मिळू शकतं अशीही चर्चा आहे. मात्र राज्यात मविआचं सरकार आलं तर मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष अजित पवार यांच्या भूमिकेकडं लागलं आहे.

Team Global News Marathi: