“खंडणी वसूली सोडून तुमचं सरकार.”, भातखळकरांचा अनिल परबांना टोला

 

मुंबई | परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी (२५ मार्च) विधानसभेत बोलत असतांना तीन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला नाही. तसेच या संपावर तोडगा काढण्यास सरकार अपयशी ठरल्याचे मान्य केले आहे. दरम्यान, हाच मुद्धा पकडत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले की,’सरकार एसटीच्या संपावर तोडगा काढण्यात अपयशी ठरलं असं अनिल परबांनी भर विधानपरिषदेत मान्य केलं. खंडणी वसूली सोडून तुमचं सरकार सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे’, असे भातखळकर म्हणाले.

 

‘एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांची मान्यता मिळावी या मागणीवर समितीने सर्वांचे ऐकून घेतले. या संपाचे नेतृत्व करणाऱ्या सदाभाऊ खोत आणि गोपीचं पडळकरांशी बोललो. तेव्हा त्यांनी पगारवाढीची मागणी केली. तेव्हा आम्ही पगारात पाच हजार रुपये वाढवून दिले. ज्यावेळी पगारात एवढी वाढ केली जाते तेव्हा पगार आठ हजारांनी वाढतो. इतिहासात एवढा पगार कधी वाढला नव्हता’, असेही परब काल विधानसभेत म्हणाले.

Team Global News Marathi: