खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या OBC नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? – रोहिणी खडसे

 

मुंबई | ओबीसींचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यामुकलर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. त्याविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर आज चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे.

 

 

आता  या आंदोलनावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीथेट भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लबोल केला आहे. ते आंदोलन करताना मा. खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना, असा सवाल रोहिणी खडसे यांनी भाजपला विचारला आहे. रोहिणी खडसे यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे.

 

 पुढे आणखी एक ट्विट करून रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केला आहे. ‘आदरणीय फडणवीस साहेब. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर 1/8/2019 रोजी तसेच दि. 18/9/2019 रोजी राज्य सरकारकडून केंद्राकडे इंपिरिकल डाटा मागितला होता ना? तो मिळाला नाही. खरंतर तेव्हाच अध्यादेशाद्वारा केलेले आरक्षणातील बदल टिकणार नाही, हे तुम्हाला माहित व्हायला हवे होते’ असं रोहिणी खडसेंनी ट्विट केलं आहे.

Team Global News Marathi: