“खडसे, मुंडे, तावडेंची ‘…याद करो कुर्बानी’, भाजपच्या बॅनरबाजीवर काँग्रेसचे बॅनर लावून उत्तर”

 

नागपूर | स्थानिक स्वराज्य निवडणुकीत OBC आरक्षण रद्द झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरू आहे. नागपूरमध्येही भाजपने चक्का जाम आंदोलनाची तयारी केली आहे. मात्र युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे या OBC नेत्यांसोबत भाजपने काय केलं? असा सवाल उपस्थित करत भाजपच्या बॅनरवर काँग्रेसने बॅनर लावून आंदोलनांची हवाच काढून टाकली आहे. सध्या काँग्रेसचे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आज भारतीय जनता पक्षातर्फे OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील आघाडी सरकारच्या अडचणी वाडवण्यासाठी आंदोलनाही हाक दिली होती. याच पार्श्वभूमीवर मुंबई, कोल्हापूर, पुणे तसेच नागपूर सारख्या बड्या शहरांमध्य प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरवात झाली आहे. नागपूरच्या व्हेरायटी चौक इथं भाजपकडून चक्का जाम आंदोलन केले जात आहे. यावेळी उड्डाणपुलावर भाजपाने चक्का जाम आंदोलनाचे भलेमोठे बॅनर लावले होते. या बॅनरवर युवक काँग्रेसचे नेते अक्षय अरुण हेटे यांनी एक बॅनर लावले.

या बॅनरवर एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे व सुधाकर कोहळे यांचे फोटो बॅनरवर लावून भाजप ने या OBC नेत्यांसोबत काय केले हा प्रश्न उपस्थित केला. या नेत्यांच्या फोटोवर ‘जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बांनी’ असा मजकूरही लिहिला आहे. हे बॅनर पाहिल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. एका कार्यकर्त्याने पुलावर जाऊन हे बॅनर काढून टाकले होते.

Team Global News Marathi: