खडसेंनी दिला पुन्हा एकदा भाजपाला जोरदार धक्का, १८ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी पक्षात शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशानंतर जळगावात भाजपातील अनेक बड्या नेत्यांनी राष्ट्र्वादीत प्रवेश केला होता. आता त्या पाठोपाठ शनिवारी पुन्हा एकदा खडसेंनी भाजपाला जोरदार धक्का दिला आहे..

सावळमधील १८ विद्यमान नगरसेवक आणि १३ माजी नगरसेवक व कुटुंबियांनी जळगाव इथं राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे नेते आणि समर्थक उपस्थित होते.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत एकूण ३१ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले मफलर घालून प्रवेश केलेल्यांचा सत्कारकेला. भाजपमधून जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी सौ. भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे आणि अनेक माजी नगसेवक व आजी माजी नगरसेवकांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश आहे

Team Global News Marathi: