भाजपाची २०२४ ला पुन्हा सत्ता आली तर ९० टक्के कामगार कायदे मोडीत निघतील

२०२४ ला केंद्रात पूण अभारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर ९० टक्के कामगार कायदे मोडीत निघीतल अशी भीती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच भाजपाला निवडून न देण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.

मंत्री जयंत पाटील राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने जळगाव दौऱ्यावर आहेत. काल एका सभेच्या निमित्ताने जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदी तसेच केंद्र सत्तेत असलेल्या भाजपावेळ जोरदार निशाणा साधला होता . यावेळी बोलताना त्यांनी देशात २०२४ ला पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर ९० टक्के कामगार कायदे मोडीत निघतील, असे विधान त्यांनी केले होते.

देशात भारतीय जनता पार्टी पक्ष हा पुंजी पंती लोकांचा पक्ष आहे समजला जायचा परंतु गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यामुळे भाजपा हा बहुजनांचा पक्ष आहे म्हणून अशी ओळख निर्माण झाली. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला प्रतिसाद मिळायला लागला आणि त्याच कारणामुळे भाजपला सत्ता स्थापन करता आली, असंही जयंत पाटील म्हणाले.

Team Global News Marathi: