खडसेंना कोर्टाकडून दिलासा, तूर्तास कोणतेही वॉरंट जारी न करण्याचे निर्देश

 

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना उच्च न्यायालयाने अखेर दिलासा दिला आहे. तूर्तास कोणतेही वॉरंट जारी न करण्याचे निर्देश देत खडसेंना नियमित जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे खडसे यांना दिलासा मिळाला आहे.

एकनाथ खडसें यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे एकनाख खडसे हे सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. यावर न्यायालयाने त्यांना आठवड्याभराचा अवधी देत, सत्र न्यायालयात दाद मागण्यासाठी आठवड्याचा अवधी दिला आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर पार पडली.

दरम्यान, भोसरी प्रकरणी एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही काही दिवसांपूर्वी हायकोर्टाने ताप्तुरता दिलासा दिला होता. त्यांना तपासयंत्रणेला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देत आठवड्यातून दोनदा ईडी कार्यालयात हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Team Global News Marathi: