“अजित पवारांनीही सकाळचा शपथविधी केला होता, मग आम्ही त्यांनाही गद्दार म्हणायचं का?”

 

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे.

यातच महाविकास आघाडीमधील नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. तर शिंदे गट आणि भाजपही पलटवार करत आहे. अजित पवार यांनीही सकाळचा शपथविधी केला होता, मग त्यांनाही गद्दार म्हणायचे का, असा रोकडा सवाल शिंदे गटातील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. अजित पवार यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली होती. याच टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहेत. टीका करणे त्यांचे काम आहे. पण अजित पवार यांनीही सकाळचा शपथविधी केला होता. मग आम्ही पण त्यांना गद्दार म्हणायचे का, असा खोचक सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.

Team Global News Marathi: