केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा तीन दिवसीय बारामती दौरा

 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना विविध लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लवकरच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत.

बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघ आहे. आता सुप्रिया सुळेंचा मतदारसंघ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण पिंजून काढणार आहेत. निर्मला तीन दिवसांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. २२ ते २४ सप्टेंबर २०२२ असा त्यांचा दौरा असेल.

भाजपने बारामती लोकसभा मतदासंघाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवली आहे. या तीन दिवसांच्या दौऱ्यामध्ये निर्मला सीतारमण या खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड या विधानसभा मतदारसंघात जाणार आहेत. या ठिकाणी विविध एकवीस कार्यक्रम आयोजित केले असून या कार्यक्रमाचा शेवट पुणे इथे पत्रकार परिषदेने होणार आहे.

बारामती मतदारसंघ हा मागील ५५ वर्षांपासून शरद पवार पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आहे. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्त्व करत आहेत.

Team Global News Marathi: