संजय राऊतांना दिलासा नाहीच! जेलमध्ये मुक्काम वाढला

 

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा १४ दिवसांची वाढ केली आहे. ०४ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांच्या जेलमध्ये मुक्काम वाढला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. आज राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर केले होते. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 04 ऑक्टोबपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नियमित आणि जामीन अर्ज सुनावणी एकाच वेळी घ्यावी अशी विनंती राऊत यांच्या वकिलांनी केली होती.

पण कोर्टाने न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. त्यामुळे राऊत यांना सप्टेंबर महिना जेलमध्ये मुक्कामी राहावे लागणार आहे. काय आहे प्रकरण? मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील ६७२ कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी २००८ मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली.

मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून ६७२ फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते.उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले.

Team Global News Marathi: