“२५ वर्षे सत्तेत सडलो म्हणता, यांनी अडीच वर्षात वाट लावली त्याचं काय?”

 

मागच्या काही दिवसांपासून शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम नाराज असल्याची चर्चा होती. त्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडत असल्याचं चित्र निर्माण झाले. दरम्यान, यानंतर भावूक होत रामदास कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केला. आपल्या भावना व्यक्त करताना रामदास कदम भावूकही झाले होते.

“आज शिवसेना प्रमुख असते तर तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन मुख्यमत्री होऊ दिलं असतं का? हे तुमच्या मनाला विचारून पाहा. बाळासाहेबांनी आपल्यासाठी कोणतंही पद घेतलं नाही. तुम्ही विचारसरणी बदललीत. आपला पक्ष वाढवून आमदार निवडून तुम्ही मुख्यमंत्रिपदी बसला असता तर आनंद झाला असता. भाजपनं २५ आपल्याला सडवली म्हणता, त्यांना २५ वर्ष लागली, पण यांनी अडीच वर्षात आपली वाट लावून टाकली त्याचं काय?,” असा सवाल रामदास कदम यांनी केला.

कदम यांनीआज माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित पवारांनी अडीच वर्षांत वाट लावली त्याचा अभ्यास कोण करणार? असंही ते म्हणाले.आता आम्ही अनिल परब यांचा फोटो केबिनमध्ये लावायचा का? अॅडव्होकेट जनरल झाले का?, त्यांचं योगदान काय, कोणत्या दंगलीत ते समोर गेले? कोणी फटके खाललेत, कधी सांगू, पण आता हकालपट्टी केलीये, असंही ते म्हणाले.

केंद्रात श्रीकांत शिंदे यांना संधी’? पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांना देणार स्पेशल गिफ्ट

उद्धव ठाकरेंना धक्का, केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला २ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता

Team Global News Marathi: