केंद्र सरकारने आधारच्या नियमात केला बदल; तुमच्यावर होणार हा परिणाम

 

आधार कार्डबाबत केंद्र सरकारने नियम बदलला आहे. हा नियम जर तुम्ही समजून घेतला नाहीत तर तुमचं नुकसान होऊ शकतं. याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे. आधार कार्ड सगळीकडे आपल्याला आवश्यक असतं. अगदी बँकेपासून ते ओळखपत्र म्हणून वापरण्यासाठी. त्यामुळे हा केंद्र सरकारचा नियम काय बदलला ते समजून घेऊया.


CNBC आवाजच्या रिपोर्टनुसार आधार कार्ड आता दर १० वर्षांनी अपडेट करावं लागणार आहे, अशी माहिती UIDAI ने दिली आहे. दर 10 वर्षांनी ते करणं बंधनकारक असले. याबाबत मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत. या अपडेटसाठी आधार कार्ड धारकांना ओळखपुरावा आणि अॅड्रेस प्रूफ देणं बंधनकारक आहे. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ही प्रक्रिया करू शकता. ऑफलाइन केल्यास तुम्हाला 50 रुपये द्यावे लागू शकतात.

ऑनलाइन अपडेट करण्यासाठी आधार कार्डच्या ऑनलाइन uidai.gov.in पोर्टलवर भेट द्या. तिथे प्रोसेस टू अपडेट अॅड्रेस हा पर्याय निवडा. तुमचा आधार नंबर आणि लिंक असलेला नंबर अपलोड करा. तुम्हाला एक OTP येईल. तुमचा नंबर वैध असल्याचं त्यावरून समजेल. त्यानंतर Proceed to Update Address वर क्लीक करा.

Team Global News Marathi: