केदार दिघेंनी बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक होत शिंदेच्या विरोधात कसली कंबर

 

मागच्या दिड महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात उलथापालथ पहायला मिळत आहे. शिवसेनेतील 41 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. दरम्यान बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. या सगळ्यात ठाणे जिल्ह्यात मोठ्या घडामोडी घडल्या ठाणे जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करत शिवसेनेने नवीन नियुक्त्या केल्या यामध्ये केदार दिघे यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.

केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात जोरदार उतरणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. केदार दिघे यांची मागच्या दोन दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, यानंतर त्यांनी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळ येथे नतमस्तक होऊन नवीन कार्यास सुरवात केली त्यांनी ट्वीटरवर फोटो शेअर केला आहे.

दरम्यान आज (दि.09) मुख्यमंत्री शिंदे यांच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार आणि दुसरीकडे केदार दिघे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला नतमस्तक होत कार्याला सुरूवात केली. यामुळे केदार दिघे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कितपत आव्हान देतात हा येणारा काळ ठरवणार आहे. परंतु ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला बळकटी देण्यासाठी दिघे काम करणार असल्याचे बोलेल जात आहे.

Team Global News Marathi: