भाजप नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

 

तेलंगणा या ठिकाणी भारतीय जन पक्षाचे नेते ज्ञानेंद्र प्रसाद यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे उघडकीस आले आहे. ज्ञानेंद्र प्रसाद यांनी आपल्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

ज्ञानेंद्र प्रसाद हे सरलिंगमपल्ली मतदारसंघातून पक्षाच्या राज्य कार्यकारिणी समितीचे सदस्य होते. पेंटहाऊसमधील एका खोलीत ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्यांच्या स्वीय सहायकाला आढळून आला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी ज्ञानेंद्र प्रसाद यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यांना त्या ठिकाणी कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही.

सोमवारी सकाळी ज्ञानेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या पीएला झोपायला जात असल्याने त्रास देऊ नका, असं सांगितलं. नंतर पीएनं नाश्ता देण्यासाठी खोलीचा दरवाजा ठोठावला असता, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर पीएनं खिडकीच्या काचा फोडल्या, तेव्हा त्यांना ज्ञानेंद्र प्रसाद खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले असल्याची माहिती ज्ञानेंद्र प्रसाद यांच्या पीएकडून देण्यात आली आहे.

Team Global News Marathi: