केदारनाथ पुरोहितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला केला विरोध

 

दिवाळी सणाच्या निमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, चक्क केदारनाथ धामातील पुरोहितांनीच पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याचा जोरदार विरोध केला आहे. आता पुरोहितांनी विरोध केल्यानंतर त्यांना समजावण्यासाठी थेट मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार बुधवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पंतप्रधानांच्या दौऱ्याचा विरोध करणाऱ्या पुरोहितांची समजूत घालण्यासाठी केदारनाथ धाममध्ये दाखल झाले. बंद खोलीत मुख्यमंत्र्यांनी बराच वेळ पुरोहितांना समजावण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आलेली आहे.

दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि कॅबिनेट मंत्री धन सिंह रावत यांच्यासहीत भाजप प्रदेशाध्यक्षांचा केदारनाथमध्ये जोरदार विरोध करण्यात आला. माजी मुख्यमंत्री रावत यांना पुरोहितांनी दर्शनाचीही संधी दिली नाही. तब्बल सात तास केदारनाथ धाममध्ये राहूनही रावत यांना दर्शन घेता आलं नाही. त्यानंतर पुरोहितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचाही विरोध करण्याचा निर्णय जाहीर केला.

Team Global News Marathi: