‘होऊन जाऊ दे, दूध का दूध और पानी का पानी भाजपने स्वीकारकले जयंत पाटलांचे आव्हान

 

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाले. १३ तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना ईडीने अटक केली आहे. त्यापाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही कारवाई करण्यात आली. आयकर विभागाने अजित पवारांच्या ५ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. याचपार्श्वभूमीवर मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

अजित पवार यांच्या मालमत्ता जप्त केल्याची ओरड केली जात आहे. मात्र, त्या मालमत्ता त्यांच्या आहेत की नाहीत याचीही खातरजमा केली जात नाही. काहीही सिद्ध होत नसताना केवळ बदनामीसाठी हे सगळं भाजप करत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारापुढे भाजपची कशी धूळधाण उडाली हे सगळेच पाहत आहेत. त्यामुळे निवडणुकांना आम्ही घाबरत नसून पुन्हा निवडणूक घेतली तर राज्यात भाजपचे १०५ आमदार आहेत ती संख्या ४० वर येईल’, असा सणसणीत टोला जयंत पाटील यांनी लगावला होता. जयंत पाटील यांच्या या विधानावरुन भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले की, पुन्हा निवडणूक घेतली तर राज्यात भाजपचे १०५ आमदार आहेत ती संख्या ४० वर येईल’, असे जयंत पाटील म्हणतात. चला, स्वीकारले आव्हान. होऊन जाऊ दे… दूध का दूध और पानी का पानी, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: