“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये”

 

शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी होऊन 22 दिवस उलटून गेले. इतकं होऊनही राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार अजून झालेला नाही. राज्यात चाललेल्या सगळ्या कामांचा आढावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत आहेत. यातच मंत्रीमंडळ विस्तारावरून अनेक आरोप केले जात आहेत. हे सरकर लवकर पडेल, असं भाकित नेत्यांकडून व्यक्त केलं जात आहे. यावर खासदार उद्यनराजे भोसले यांनी आपलं मत मांडलं.

आम्ही सर्व फडणवीसांवर प्रेम करतो. उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसादिवशी ते आम्हाला भेटले यामुळे आम्हाला बंर वाटलंं. त्यांना शुभेच्छा द्यायची संधी मिळाली. मंत्रीमंडळाचा विस्तार 3-4 दिवसांत होईल, असंही ते म्हणाले. काळजी करू नका, हे सरकार कोसळणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये, असंही ते पुढे म्हणाले.

हा मंत्रीमंडळ विस्तार 19 तारखेला होणार होता मात्र कोर्टात सुणावणी होणार असल्याने तो पुढे ढकलला होता. त्यानंतर आता 23 जुलैला भाजपची प्रदेश कार्यकारणीची बैठक होणार आहे. 24 जुलैला आदिवासी पांड्यावर भाजपकडून जल्लोष करण्यात येणार आहे. 25 जुलैला राष्ट्रपती पदाची शपशविधी होईल. त्यानंतर आता मंत्रीमंडळविस्तार व्हायला 26-27 तारीख उजाडेल. 12 जणांचा शपथविधी पहिल्या टप्प्यात होणार असल्याची माहिती आहे.

रत्नागिरीत शिंदे-ठाकरे यांच्या बॅनरवरुन दोन गटातील वाद चिघळणार? मोठा पोलीस बंदोबस्त

महापालिका निवडणुकीसाठी येत्या शुक्रवारी आरक्षण सोडत

 

Team Global News Marathi: