“डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?”

 

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून जवळपास 20 दिवस झाले तरी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण जनतेचं मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष आहे. विशेष म्हणजे याच मुद्द्यावरुन विरोधकांकडून नव्या सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार आणि कधीकाळी भारतीय जनता पक्षाचे मंत्री राहिलेले एकनाथ खडसे यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. त्या जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत नवण्याने स्थापन झालेल्या सरकारला टोला लगावला होता.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा पाळणा हलला. मात्र, अद्यापही इतर मंत्र्यांचा पाळणा हललेला नाही. डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, असं म्हणत एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधलाय. दरम्यान, अनेक बंडखोर मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. पण, आता सेना भवनातून काहीही ठरत नाही, दिल्लीला जाऊन परवानगी आणावी लागते, असा टोलाही खडसेंनी लगावला आहे.

“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये”.

रत्नागिरीत शिंदे-ठाकरे यांच्या बॅनरवरुन दोन गटातील वाद चिघळणार? मोठा पोलीस बंदोबस्त

Team Global News Marathi: