मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात गॅस गळती, अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल !

 

मुंबई | मुंबईतील सुप्रसिद्ध असलेल्या कस्तुरबा गांधी रूग्णालयात मोठी दुर्घटना घडली असून या रूग्णालयात गॅस गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगेचच सर्व कार्यक्रम रद्द करून घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

 

समोर आलेल्या माहिती नुसार सकाळी ११:३० च्या सुमारास घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्य ४ गाड्या तर ३ वाॅटर टॅंकर घटनास्थळी पोहचले आहेत. घटनेनंतर रूग्णालयातील रूग्णांना बाहेर काढलं. ही गॅसगळती तुलनेनं मोठी नसल्यानं कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही.

सकाळी परिसरातील लोकांना गॅसचा वास येत असल्यानं, लोकांनी रूग्णालय प्रशासनला माहिती दिली आणि तात्काळ अग्नीशमन दलाला फोन लावला. एलपीजी गॅस लीक झाल्याचं त्यांनी अग्नीशमन दलाला सांगितलं. त्यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागल्या असून गॅस लीक थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

Team Global News Marathi: