सोशल मीडियाद्वारे करिना कपूरवर बहिष्कार घालण्याची होत आहे मागणी !

मुंबई | अभिनेत्री करीना कपूर-खान साध्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाऊ लागले आहे. त्यातच आता ट्विटरवर नेटकऱ्यांनी करीनावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर करिनावर बहिष्कार घालण्याची मागणी सोशल मीडियाद्वारे होत आहे. यामागचं कारण म्हणजे एका सिनेमात करिनाने ‘सीतेची’ भूमिका साकारण्यासाठी तब्बल १२ कोटी रुपयांची मागणी केली आहे.

सदर बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावरही व्हायरल झाली होती. बातमी वाचून संतापलेल्या काही नेटकऱ्यांनी करिनाच्या विरोधात संताप व्यक्त केला. सर्वांनी मिळून करिनाला ट्रोल करायला सुरुवात केले आहे. त्यातूनच ट्विटरवर #BoycottKareenaKhan हा हॅशटॅग ट्रेंड मध्ये आला आहे. या सर्व प्रकरणामुळे करिना कपूरवर बहिष्कार घालण्याची आग्रही मागणी केली जात आहे. तसेच सीतेची भूमिका ही एखाद्या हिंदू अभिनेत्रीला द्यावी, अशी मागणी देखील होतांना दिसत आहे.

दरम्यान, एका वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चित्रपटाचे लेखक के.व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, करिनाला या सिनेमात काम करण्यासाठी अजूनपर्यंत विचारणाच करण्यात आलेली नाही. आता चित्रपटाच्या लेखकाने करिनासंबंधीची बातमी चुकीची असल्याचं सांगितलं जातं आहे. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर प्रकरण शांत होईल असे वाटत होते.

मात्र तसं काहीही झालं नाही. तसेच याच चित्रपटात रणवीर सिंगला रावणाच्या भूमिकेची ऑफर दिली होती. मात्र, याबद्दलही अद्याप कुणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. करिना ही लवकरच ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपट आमिर खान देखील असणार आहे. गेल्या वर्षीच या सिनेमाचे चित्रीकरण झाले होते. आता लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Team Global News Marathi: