मुंबई : सतत आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री राखी सावंत नेहमीच रोखठोख भूमिका मांडत असते. या तिच्या भूमिकेमुळे अनेकदा तिला ट्रोल सुद्धा करण्यात येते. मात्र यावेळी तिने चक्क अभिनेत्री कंगना राणावत हिच्याशी पंगा घेतला आहे, नुसती पोकळ बडबड करण्याऐवजी कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी मदत कर असा सल्ला राखीने कंगनाला दिला आहे.
राखीनं काही दिवसांपूर्वी वृत्त माध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं देशवासींना डबल मास्क वापरण्याचा सल्ला दिला. तसेच दररोज हात स्वच्छ करा. सॅनिटायझर वापरा, कारणाशिवाय घराबाहेर पडू नका. लॉकडाउनच्या नियमांचे पालन करा असा सल्ला दिला. मात्र आता तिने थेट कंगनाशी पंगा घेतला आहे. “नुसती पोकळ बडबड करणं थांबव. तुझ्याकडे कोट्यवधी रुपये आहेत. त्यापैकी थोडे पैसे दान कर कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी मदत कर” असा उपरोधिक टोला तिनं कंगनाला लगावला आहे.
सध्या देशभरात मोठया प्रमाणात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे तसेच दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. त्यातच देशभरात लसीकरण मोहीम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आलेली आहे, तसेच १ मे पासून आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना सुद्धा लसीकरण करता येणार आहे. मात्र महाराष्ट्रात इतक्यातच १८ वर्षवरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु होणार नाही असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ठ केले आहे.