बिकनी फोटोमुळे कंगना राणावत पुन्हा ट्रोल

बिकनी फोटोमुळे कंगना राणावत पुन्हा ट्रोल

सिनेभिनेत्री कंगना राणावत काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्त्यव्यामुळे सतत चर्चेत होती. त्यात कृषी कायद्यावर वक्तव्य करत नवा वाद कंगनाने अंगावर ओढावून घेतला होता. त्यात आता सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या बिकनीतील फोटोमुळे तिच्यावर सर्व बाजूंनी टीका होताना दिसत आहे.

कंगनानं बिकीनी लूकमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून तिच्या चाहत्यांकडून प्रतिक्रिया आणि लाइक्सचा पाऊस पडला आहे. असे असले तरी अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्नही केला आहे.

कंगनानं मॅक्सिकोमधील बेटावर काढलेला बिकीनीतील फोटो शेअर केला आहे. ‘ मित्रांनो सुप्रभात. मला आवडेल्या आणि सुंदर असलेल्या ठिकाणांपैकी एक ठिकाण हे मॅक्सिकोत आहे. मॅक्सिकोतील एका बेटावर निवांतक्षणी काढलेला हा फोटो’, असं कंगनानं तिच्या फोटोच्य कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

कंगनाचा हा बिकीनी लूक अनेक जणांना आवडला नाही. काहींनी तिला भारतीय संस्कृती आठवण करून दिली तर काहींनी तिला संस्काराबद्दल प्रश्न विचारले. हिच का हिंदू संस्कृती? तुझे संस्कार विसरलीस का?असे टोले तिला नेटकऱ्यांनी लगावले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: