अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील ई-मेल वाद चांगलाच गाजताना दिसून येत होता. त्यातच या प्रकरणाची चुकाही करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचच्या कार्यालयात हृतिकने हजेरी लावली आहे.
कंगनाने मागच्यावर्षी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हृतिक रोशनवर हल्लाबोल करताना त्याच्यावर थेट फसवणुकीचा आरोप लावला होता. तसेच कंगनाने हृतिक आणि आपल्यामध्ये काही ईमेल्सच्या माध्यमातून संवाद झाल्याचे देखील सांगितले होते यावरून कलाविश्वात एकचं खळबळ उडाली होती.
दरम्यान, याच प्रकरणावरून अभिनेता हृतिक रोशनला मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकासमोर हजर राहण्याचे समन्स बजावले होते. यानुसार हृतिक आज आयुक्तालयाच्या कार्यालयात दाखल झाला आहे.