कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी शिंदे गटाचे आमदार आणि खासदार मुंबई विमानतळावर दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांसह आज गुवाहाटीला जात आहेत. थोड्याच वेळात ते आमदारांसह मुंबई विमानतळावरुन गुवाहाटीच्या दिशेनं रवाना होणार आहेत. आमदारांसह खासदारही गुवाहाटीला जाणार आहेत. तिथे जाऊन सर्व आमदार कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी गुवाहाटीत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.

शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी व्हाया सुरत गुवाहाटी गाठलं होतं. तिथं त्यांच्यासह सर्व आमदारांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. तेव्हा कामाख्या देवीला केलेला नवस फेडण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सगळ्याच आमदारांसह गुवाहाटीला आज जात आहेत. अगदी थोड्याच वेळात एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह आज मुंबईहून गुवाहाटीला रवाना होणार आहेत.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुवाहाटीची चांगलीच चर्चा आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं. मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यात कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. त्याशिवाय आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांच्याही भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यासाठी काही महिने आधीपासूनच तयारी सुरू करण्यात आली होती.

शिंदे गटाचे मंत्री, आमदार आणि खासदार मुंबई विमानतळावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी माध्यमांनीकाही नेत्यांनी संवाद साधला. आम्ही कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जात आहोत. आम्हाला याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया आमदार सदा सरवणकर यांनी दिली. दोन तीन महिन्यात सरकारनं चांगल कामं केलं आहे. आमच्या मागे देवीचे आशिर्वाद असल्याचे सरवणकर म्हणाले.

Team Global News Marathi: