काही पालख्या गुजरातला, तर काही गुवाहटीला, आम्ही मात्र माऊलींसोबत

 

मुंबई | राज्यातील काही पालख्या गुजरातला जात आहेत, तर काही पालख्या गुवाहटीला जात आहेत. आम्ही मात्र माऊलींच्या पालखीसोबत असल्याचे वक्तव्य शिवेसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी केलं आहे. राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा शेवट गोड होणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्राची संस्कृती बदलण्यासाठी जे काही लोक प्रयत्न करत आहेत, त्यांचा विनाश व्हावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलं आरोग्य मिळावं, अशी मागणी खंडेरायाच्या चरणी आज केली असल्याचे सचिन अहिर म्हणाले.

शिवसेनेचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन घेतलं. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी असं वक्तव्य केलं आहे. राज्यातील काही पालख्या गुजरातला जात आहेत, काही पालख्या गुवाहटीला जात आहेत, आम्ही मात्र, माऊलीच्या पालखीसोबत आहोत, असे म्हणत अहीर यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.

राज्यांमध्ये जे काही सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे, त्याचा शेवट गोड होईल, असंही ते म्हणाले आहेत. शिवसेनेला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आम्ही काम करणार असून आम्ही कोणाचे घर फोडायचे काम केलं नाही, तर पक्षवाढीसाठी काम करत आहोत. हे लोक माणसं विकत घेऊ शकतात, दबाव आणू शकतात, मात्र विचार विकत घेऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

Team Global News Marathi: