कबीर सिंगची प्रीती जलपरीसारखी पोहतेय; तिचा हॉट अंदाजातला ‘हा’ व्हिडिओ होतोय तुफान वायरल

मुंबई । अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे चाहते तिच्या प्रत्येक नवीन पोस्टची आतुरतेने वाट पाहात असतात. अशातच आता कियारानं तिच्या सोशल मीडियावर एक अतिशय सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे, जो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये कियारा निऑन कलरच्या बिकिनीमध्ये आहे. सोबतच पाण्याखाली स्विमिंग करत खोल जाण्याच्या प्रयत्नात ती आहे. तिचा हा अंदाज चाहत्यांना वेड लावत आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिला आहे. तसेच अनेकांनी तिच्या या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट सुद्धा केल्या आहेत. त्यामुळे किरायाचा हा व्हिडिओ सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे.

दरम्यान, कियारा अडवाणीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, किरायाने ‘फुगली’ या चित्रपटामधून २०१४ ला बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र ‘कबीर सिंग’ या चित्रपटाने तिला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली.

Team Global: