“काळ आला होता भाऊ किंवा भाईंवर, पण मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार”

 

मुंबई | विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक आज सोमवारी होत असून दहावी जागा महाविकास आघाडी जिंकणार का? याबाबत कमालीची उत्सुकता वाढली आहे. ‘शेरास सव्वाशेर मिळतोच’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना देत राज्यसभा निवडणुकीचा बदला घेणार असे आव्हानच दिले होते. अशातच आता भाजपा नेते अनिल बोंडें यांनी सूचक ट्विट करून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.


‘काळ आला होता भाऊ किंवा भाईंवर, पण मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार’, असं ट्विट अनिल बोंडे यांनी केलं आहे. अनिल बोंडे यांनी विधान परिषद निवडणुकीत कुणाचा पराभव होणार याचं भाकित वर्तवलं आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहे. आकडेवारीचं गणित पाहता महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे या लढाईतून कोण बाहेर पडणार याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अश्यातच अनिल बोंडे यांनी हे सूचक ट्विट केलं आहे.

विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश पाडवी हे रिंगणात आहेत.तर काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे निवडणूक लढवत आहेत. संख्याबळ पाहता काँग्रेसचा एक उमेदवार पराभीत होईल, असा अंदाज आहे. त्यावरच भाष्य करणारं आणि निवडणुकीच्या निकालाचं भाकित वर्तवणारं ट्विट अनिल बोंडे यांनी केलं आहे.

Team Global News Marathi: