‘कश्मीर फाइल्स’ टॅक्स फ्री कशाला. यूटय़ूबवर दाखवा! अरविंद केजरीवाल यांची मागणी

 

नवी दिल्ली | भारतीय जनता पक्षाचे लोक ‘कश्मीर फाइल्स’ चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी करत आहेत. जास्तीत जास्त लोकांना हा चित्रपट पाहता यावा यासाठी तुम्ही मागणी करत असाल तर चित्रपट थेट यूटय़ूबवर टाका एकदम फ्री हेईल, असा टोला लगावत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविद केजरीवाल यांनी ‘कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या निमित्ताने राजकारण करू पाहणाऱया भाजप नेत्यांवर निशाणा साधला दिल्ली विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजप आमदारांना चांगलाच टोला लगावला होता.

तुम्ही ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी का करत आहात? करमुक्त करण्याची गरजच काय? तुम्हाला एवढेच वाटत तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना हा चित्रपट यूटय़ूबवर टाकायला सांगा. सर्व लोकांना फुकट पाहता येईल, असे केजरीवाल म्हणाले. कश्मिरी पंडितांच्या नावावर कुणीतरी कोटय़वधींची कमाई करत आहे आणि भाजपवाल्यांना त्यांनी चित्रपटाचे पोस्टर लावण्याचे काम दिले आहे, असाही टोलाही त्यांनी लगावला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजप आमदारांनाही ‘आप’मध्ये सामील व्हावे. तुम्ही आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला ‘द कश्मीर फाइल्स’सारख्या खोटय़ा चित्रपटांचे पोस्टर लावण्याचे काम देणार नाही. आम्ही तुम्हाला चित्रपटाचे प्रमोशन करायला लावणार नाही. चांगले काम देऊ, जनतेच्या भल्यासाठीचे काम देऊ, असे केजरीवाल म्हणाले.

Team Global News Marathi: