ज्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधली… एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

 

जय पराजय हा मोकळेपणाने स्वीकारायचा असतो. त्याला आपण खिळाडू वृत्ती बोलतो. ज्यांनी आयुष्यात कुठलाही खेळ खेळला नसेल. आम्ही आयुष्यभर खेळाडू राहिलो. वेगवेगळे खेळ खेळलो त्यामुळे आमच्याकडे खिळाडूवृत्ती आहे.आम्ही हरलो तर हरलो म्हणतो, जिंकलो तर जिंकलो म्हणतो अशीच लोक जिंकत राहतात असं सांगत मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीकास्त्र सोडलं आहे.

दीपक केसरकर म्हणाले की, एकीकडे दारे खुली आहेत असं म्हणायचं. दुसरीकडे पाठीमागून माणसं पाठवायची. याला संस्कृती म्हणतात का? माझ्यामागे गाड्या लावल्या होत्या. मी फोन करून सांगितले. ज्याला जायचं तो खुलेमनाने स्वाभिमानाने जातो. पाठीमागून माणसं पाठवायची ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असंही त्यांनी म्हटलं.

तसेच बाळासाहेबांच्या विचारांची परंपरा राखण्याचं काम केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. ज्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधली त्यांनी कुठेही मेळावे घ्यावेत. त्या व्यासपीठावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना बोलवावं त्यावर आमचं काही म्हणणं नाही असं सांगत केसरकरांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

Team Global News Marathi: