भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी घेतले सासरे मुलायम सिंह यांचे आशीर्वाद

 

पाटणा | भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी लखनऊला पोहोचून सासरे मुलायम सिंह यादव यांचे आशीर्वाद घेतले. अपर्णा यांनी समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचा आशीर्वाद घेतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अपर्णा यादव यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

समाजवादी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. लखनऊच्या कॅन्ट मतदारसंघातून भाजप अपर्णा यादव यांना तिकीट देऊ शकते, असे मानले जात आहे. कारण अपर्णा यांनी २०१७ मध्ये तेथून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपच्या उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता.

राज्यात निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासूनच अपर्णा यादव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. तीन दिवसांपूर्वी सपा अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, समाजवादी परिवारात सर्व काही ठीक चालले आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश करत अखिलेश यादव यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे.

Team Global News Marathi: