जोडे उचलणाऱ्यांचं नाव होत नाही; पंकजा मुंडेंचा नेमका टोला कोणाला ?

 

पुन्हा एकदा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची तोफ धडाडली असून यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. काहींना वाटतं दसरा मेळाव्यातून चिखलफेक केली जाते. पण माझा मेळावा हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही. तो चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे, असं सांगतानाच संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही संघर्षाशिवाय पर्याय नाही आणि संघर्षाशिवाय नाव मिळत नाही असे विधान त्यांनी करून थेट येणाऱ्या आगामी निवडणुकीचे रंगशिग फुंकले होते.

तसेच जोडे उचलणाऱ्यांचेही नाव होत नाही, अशा शब्दात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार हल्ला चढवला. दसरा मेळाव्यानिमित्ताने सावरगावातील भक्तीगडावरून त्या जनतेशी संबोधित करत होत्या. यावेळी त्यांनी राजकीय फटकारेही लगावले. भगवान बाबांपासून ते गोपीनाथ मुंडे सर्वांनी संघर्ष केला.

चाळीस वर्षाच्या संघर्षात फक्त साडेचार वर्ष मला सत्ता मिळाली हा संघर्ष काय कमी आहे? मी संघर्षाला घाबरत नाही. शिवरायांचा पराक्रम, भगवान बाबांची सात्विकता हीच माझी प्रेरणा आहे. संघर्ष हा महत्त्वाचा आहे. संघर्षाशिवाय पर्याय नाही. संघर्षाशिवाय नाव होत नाही. जोडे उचलणाऱ्यांचं नाव होत नाही. संघर्ष हा महत्त्वाचा आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Team Global News Marathi: