दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदेंचे सूचक ट्वीट, विचारांचे वारसदार म्हणत हरिवंशराय बच्चन यांच्या ओळी पोस्ट

 

शिंदे गटाच्या वतीनं बीकेसीवर घेण्यात येणाऱ्या दसरा मेळाव्याला काही तास उरले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. केवळ माझा मुलगा असला म्हणून तो वारसदार नसेल, तर जो वारसदार असेल तोच माझा मुलगा असेल या आशयाच्या हरिवंशराय बच्चन यांच्या ओळी एकनाथ शिंदे यांनी शेअर केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी या ट्वीटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे नव्हे तर आपणच शिवसेनेच्या विचारांचे वारसदार असल्याचा दावा केल्याचं बोललं जातंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज बीकेसीवर जंगी सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून त्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्यांची गर्दी जमवली जात आहे. या सभेला अवघे दोन-तीन तास उरले असताना एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट केलं आहे. प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांच्या दोन ओळी एकनाथ शिंदे यांनी शेअर केल्या आहेत.

यामध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, केवळ माझा मुलगा असला म्हणून तो उत्तराधिकारी नसेल, तर जो उत्तराधिकारी असेल तोच माझा मुलगा असेल. शिंदे यांनी या ट्वीटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला असल्याचं स्पष्ट आहे. तसेच उद्धव ठाकरे हे केवळ बाळासाहेब ठाकरे याचे सुपुत्र असल्याने ते शिवसेनेचे उत्तराधिकारी होऊ शकत नाहीत, आपणच त्यांच्या विचारांचे वारसदार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Team Global News Marathi: