जो पर्यंत मुख्यमंत्री गप्प, तो पर्यंत विधानसभा ठप्प, चंद्रकांत पाटीलांचा इशारा

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हाच मुद्धा पकडून राज्यात विरोधी बाकावर बसलेल्या भारतीय जनता पक्षाने आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव आखला आहे. त्यात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणात क्राइम ब्रांचचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यात आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक भूमिका आघाडी सरकारला ताशोरे ओढले आहे.

मनसुख हिरेन खून प्रकरणी सचिन वाझेला संरक्षण देणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध! प्रश्न कालपण तेच होते, प्रश्न आजही तेच आहेत… जो पर्यंत मुख्यमंत्री गप्प तो पर्यंत विधानसभा ठप्प!,” असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

तसेच चंद्रकांत पाटलांनी काही सवालही आघाडी सरकार पुढे उपस्थित केले आहेत. राजकारणाचे गुन्हेगारीकरण…. फेसबुकवर संवाद साधणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता गप्प का? मनसुख हिरेनच्या पत्नीचा सचिन वाझेवर का संशय?, मनसुख हिरेनची हत्या झाल्याचे त्यांच्या पत्नीला का वाटते?, मनसुख हिरेनची गाडी सचिन वाझे वापरत होते का?, असं सवाल उपस्थित करत पाटील यांनी आघाडी सरकारला कैचीत पकडण्याचा पर्यंत केला होता.

Team Global News Marathi: