जितेंद्र आव्हाड यांचा CDR निघणार बाहेर वाढणार अडचणी

अंबानी स्फोटक प्रकरणी, १०० कोटी हप्ता वसुली अशा अनेक गंभीर आरोपामुळे आधीच चाचणीत आलेली महाविकास आघाडीच्या अडचणी आता पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाने दो जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मारहाणी प्रकरणी त्यांच्या मोबाईलचा CDR काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

मागच्या वर्षी 8 एप्रिलला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर एका व्यक्तीला अमानुष मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र, जितेंद्र आव्हाड यांना आरोपी करण्यात आले नव्हते. त्यामुळे मारहाण झालेले अभियंता अनंत करमुसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) विभागाकडून चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

उच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने पोलिसांना याप्रकरणातील CDR जपून ठेवण्याचे आदेश दिले. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलिसांचा गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यापासूनचा संपर्क तपशील नोंद (सीडीआर) आणि ग्राहक तपशील नोंद (एसडीआर) मिळवण्याचे व जपून ठेवा, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

Team Global News Marathi: