मंत्री जितेंद्र आव्हाडांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना संबोधले “हिटलर”

अहमदाबादमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. या निर्णयावरून काँग्रेस बरोबर सर्व विरोधकांनी भारतीय जनता पक्षावर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली. त्या पथपथ आता राष्ट्र्वादीने नेते आणि मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिटलर म्हणून संबोधले आहे.

आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले… हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते. असे ट्विट त्यांनी केले आहे.

तर दुसरीकर , गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी सरदार पटेल यांच्या नावे असलेल्या स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले. हा सरदार पटेलांचा अपमान नाही का? सरदार पटेल यांच्या नावाने मते मागणारी भाजप आता पटेल यांचा अपमान करत आहे. सरदार पटेल यांचा अपमान गुजराजची जनता सहन करणार नाही असे त्यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: