मीही शरद पवारांच्या तालमीत तयार, पवार साहेब राठोड याला पाठीशी घालणार नाही – चित्रा वाघ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अडचणीत सापडलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीचे सर्व कुटुंबियांसोबत दर्शन घेतले होते. तसेच यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ चांगल्याच अक्रमक झाल्या आहेत.

दरम्यान, आज चित्रा वाघ यांनी आज प्रत्यक्ष घटना स्थळाला भेट देऊन संबंधित ठिकाणाची पाहणी केली पूजाला श्रद्धांजली वाहिली यावेळी त्यांनी पुण्याचे पीआय लगड यांची भेट घेतली यावेळी चित्रा वाघ आणि वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.त्यानंतर त्यांनी मुख्यत्री उद्धव ठाकरे यांना राठोड याला मंत्री मंडळातून हाकलून देण्याची मागणी केली आहे.

तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संजय राठोड यांना पाठीशी घालणार नाहीत, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, मी शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले आहे, हे सांगायला मला जराही संकोच वाटत नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संपूर्ण तपशील शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला, तर ते संजय राठोडला पाठीशी घालणार नाहीत, हे मी विश्वासाने सांगते असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: