जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं केतकीचं वय अन लगावला पंकजा मुंडेंना टोला

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल समाज माध्यमांतून आक्षेपार्ह टिका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.तर, अट्रॉसिटी प्रकरणात केतकीला ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, केतकीच्या वयाचा विचार करता, एक वॉर्निंग देऊन या विषयाला पूर्णविराम द्यावा, असं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं होतं. आता, गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केतकीच्या मुद्द्यावरुन पंकजा मुंडेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय.

शरद पवार यांच्या बाबतीत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारी अभिनेत्री केतकी चितळे सध्या गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, केतकीच्या पोस्टवरुन राजकीय वर्तुळातही चांगलीच चर्चा रंगली होती. केतकीच्या पोस्टचं समर्थन न करता, केतकीला ज्याप्रकारे ट्रोल करण्यात आले त्यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या ट्रोलर्संवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तर, पंकजा मुंडे यांनीही केतकीचं वय पाहता, तिला वॉर्निंग देऊन ही गोष्ट संपवली पाहिजे, असे म्हटले.

मात्र दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी कुणाचेही नाव न घेता फेसबुकवरुन निशाणा साधला. आव्हाड यांनी केतकीचं वय सांगत ती लहान नसल्याचं सूचवलं आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या सगळ्या महामानवांना शिव्या द्यायच्या आणि काही लोकांनी उठायचं आणि म्हणायचं निरागस आहे सोडून द्या. ह्याला काय म्हणायचे?, असा सवाल करत आव्हाड यांनी भलीमोठ पोस्ट केली आहे.

Team Global News Marathi: