जिल्हा बँक, गोकुळमध्ये मी सुद्धा आहे हे धनंजय महाडिकांनी विसरु नये

 

कोल्हापूर | राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्याचे परिणाम कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळमध्येही त्याचे पडसाद उमटतील, असा दावा करणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांना माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी खोचक टोला लगावला आहे.ते सतेज पाटील यांना उद्देशून बोलले असावेत, पण मी सुद्धा त्यामध्ये आहे हे त्यांनी विसरू नये, असा टोला त्यांनी धनंजय महाडिक यांना लगावला.

केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव असल्याचे मुश्रीफ म्हणाले. मुश्रीफ यांनी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात बोलताना सांगितले की, धनंजय महाडिक यांनी केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघाच्या सत्तेबाबत केलेला दावा मी वाचला आणि बघितला. त्यांनी कदाचित हा दावा आमदार सतेज पाटील यांना नजरेसमोर धरून केला असावा. या दोन्हीही संस्थांमध्ये हसन मुश्रीफ हासुद्धा एक घटक आहे, हे कदाचित ते विसरले असतील.

केडीसीसी बँक आणि गोकुळ या दोन्हीही ठिकाणी सत्ताबदल अजिबात होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जरी सत्ता बदल झाला, तरी ही सगळी माणसं आपल्या जिल्ह्यातील आहेत, कोणी परकी नाहीत. निवडून आलेल्या संचालकांसाठी अनेक सभासदांनी आणि कार्यकर्त्यांनी खस्ता खालेल्या आहेत. त्यामुळे कुणीही कार्यकर्ता आणि संचालक या सत्ताबदलाला अनुकूल नसणार असे त्यांनी नमूद केले.

Team Global News Marathi: