जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव… मिसेस फडणवीस यांच्या देवेंद्रजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केल्याने राज्यात मोठी उलथापालथ होऊन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाले.एकनाथ शिंदे भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तर, उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार स्विकारला. महाराष्ट्रासाठी राज्यातील भाजप नेत्यांसाठीही हा मोठा धक्का होता. यावेळी, अमृता फडणवीस यांनी नवीन सरकारचं केवळ सरळ शब्दात अभिनंदन केलं होतं. आता, देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा अमृता यांनी दिल्या आहेत.

अमृता फडणवीस आपल्या ट्विटमधून भावनांना वाट करून देताना दिसतात. पण, सत्तातरानं देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या शुभेच्छांच ट्विट हे अतिशय सरळ-साधे व अत्यंत औपचारिक असल्याप्रमाणे दिसून आले. ‘आपले (महाराष्ट्राचे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन आणि वाटचालीसाठी शुभेच्छा’, असे औपचारिक ट्विट करत त्यांनी दोघांचे अभिनंदन केले होते. आता, वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी अडथळ्यांची शर्यत पार करत ते पुन्हा आलेच, असेच काहीसे सूचवले आहे.

 

जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!, असे अमृता यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. विशेष म्हणजे पती देवेंद्र यांना जिलेबी खाऊ घालतानाचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.

नाना पटोले व्हिडिओ प्रकरणी आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या की,

उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार, दौऱ्याची तयारी सुरू;

 

Team Global News Marathi: