“२०२४ च्या लोकसभेत उद्धव ठाकरे विजय मिळवून देऊ शकत नाहीत” सेना खासदाराच मोठं विधान

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही सक्रीय झाले आहेत. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षही दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहेत. बंडखोर आमदार त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत आहेत.

यातच आता काही दिवसांपूर्वी शिंदे गटात गेलेले राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे विजय मिळवून देऊ शकत नाहीत. त्यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करणे आवश्यक आहे, असे मत बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले. शिवसेनेत फूट पडण्याआधी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या अनेक बैठकांमध्ये पुढील लोकसभा निवडणुकीत नेतृत्वाचा मुद्दा बंडखोर नेत्यांनी उपस्थित केला होता.

उद्धव ठाकरे यांचा मी आदर करतो, मात्र आपण वास्तववादी असले पाहिजे, असे त्यांना सांगितले होते. उद्धव हे लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा चेहरा असूच शकत नाहीत, असे सांगितल्याचे शे‌वाळे म्हणाले. अनेक मतदारसंघांत विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांशी शिवसेनेने युती करणे, हा अत्यंत गुंतागुंतीचा मामला आहे. लोकसभा निवडणुकीत यूपीएचे नेते म्हणून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणे हे आम्हाला कदापि मान्य होणारे नाही, असेही शेवाळे म्हणाले.

जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव… मिसेस फडणवीस यांच्या देवेंद्रजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

नाना पटोले व्हिडिओ प्रकरणी आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या की,

 

Team Global News Marathi: