“झांसे की रानी” चे पितळ उघडे पडले!, भाजपाने आता जनतेची माफी मागावी – सचिन सावंत

खार येथील राहत्या घरावर बृहमुंबई महानगर पालिकेने केलेल्या कारवाई विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र अखेर कंगनाने याचिका मागे घेतली आहे. यावरून आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना राणावत आणि तिच्या बाजूने बोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे.

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना समर्थक आणि महाराष्ट्र द्रोही भाजपा नेत्यांनी आता महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. पुढे ट्विटमध्ये सावंत म्हणतात की, ‘भाजपाच्या “झांसे की रानी” चे पितळ उघडे पडले! महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या भाजपा नेत्यांनी बेकायदा बांधकामाला ही पाठिंबा दिला. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना समर्थक आणि महाराष्ट्र द्रोही भाजपा नेत्यांनी आता महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे.’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

खारमधील इमारतीतील तीन फ्लॅट्स अवैधरित्या एकत्र केले आहेत. मात्र, घरात हा बदल करताना इमारतीच्या प्लानमधील मुख्य स्ट्रक्चरमध्ये बदल केल्याचं पालिकचं म्हणणं आहे. यासंबंधी पालिकेनं कंगनाला नोटीस बजावली होती. या नोटिशीविरोधात तिनं हायकोर्टात धाव घेतली होती.मात्र आता आपण बीएमसीविरोधातील खटला मागे घेत असल्याचे तिने जहीर केले होते.

Team Global News Marathi: