बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा ईडीच्या ताब्यात

बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या मुंबई आणि पुणे येथील कार्यलयावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने कारवाई केली आहे. काल सकाळी पुणे येतील ABIL या कार्यलयावर ईडीचे अधिकारी दाखल झाले होते. तसेच केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्याने संपूर्ण कार्यालयाचा ताबा घेतला होता.

त्यात आता अविनाश भोसले यांच्या मुलाला चौकशी ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. इतकंच नाही तर अमित भोसले यांना अधिक चौकशीसाठी पुण्यावरुन मुंबईला आणल्याचेही सांगण्यात येत आहे.

बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर बुधवारी १० फेब्रुवारीला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने छापेमारी केली . ईडीचे अधिकारी सकाळी ८:३० पासून ABIL हाऊसमध्ये झाडाझडतीसाठी दाखल झाले. अविनाश भोसले हे मोठे बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक आहेत. परकीय चलन अर्थात फेमासंबंधीच्या प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. हे ६ वर्षांपूर्वीचे विदेशी चलन प्रकरण आहे.

Team Global News Marathi: